आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते महाआरती
जळगाव (प्रतिनिधी) :- गुरुवार दि.७ ऑगस्ट रोजी सोनार समाजाच्या वतीने संत शिरोमणी नरहरी महाराज यांची ७८२ वी जयंती साजरी करण्यात आली.
प्रसंगी जळगाव शहराचे आ. राजूमामा भोळे व मान्यवरांच्या हस्ते संत शिरोमणी नरहरी महाराज प्रतिमा पूजन व उपस्थित समाज बांधवांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
प्रसंगी अखिल भारतीय अहिर सुवर्णकार शिक्षण प्रसारक संस्था जळगाव, महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव जिल्हा जळगाव, अहिर सुवर्णकार महिला मंडळ जळगाव, ऋणानुबंध वधू वर पालक परिचय मेळावा समिती, संत नरहरी महाराज बहुउद्देशीय संस्था मेहरून, अहिर सुवर्णकार समाज सुधारक मंडळ, जळगाव जिहा सुवर्णकार कारागीर संघ, सोनार कला मंच, एस एन एस फाऊंडेशन, जळगाव सराफ बाजार सुवर्णकार कारागीर समूह जळगाव आदी संस्थाच्या वतीनं जयंती साजरी करण्यात आली. आमदार राजूमामा भोळे यांनी बोलतांना सांगितले, जळगाव शहरातील सोनार समाजाने संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या ७८२ व्या जयंती निमित्त ७८२ वृक्ष लावून वृक्षारोपण करावे अशी संकल्पना मांडली. त्यास समाजबांधवांनी दुजोरा दिला.
प्रसंगी संजय विसपुते यांनी बोलताना म्हणाले की, जळगाव शहराचे लाडके आमदार राजूमामा भोळे यांच्या सहकार्याने ७८२ वृक्षारोपण संकल्पाच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र सुवर्णकार सेना, जळगाव आणि एस. डी. फाउंडेशनचे प्रमुख सुहास दुसाने यांच्या संयुक्त विद्यमाने शहरभरात वृक्षारोपण मोहिम राबवविण्यात येईल. असा संकल्प करण्यात आला. जळगाव शहराच्या माजी नगरसेविका व अहिर सुवर्णकार महिला मंडळाच्या अध्यक्षा रंजनाताई विजय वानखेडे, महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगावचे जिल्हाध्यक्ष व माजी प्रभाग सदस्य संजय बाबुराव विसपुते, उपाध्यक्ष विजय केशव वानखेडे, प्रकाशशेठ दापोरेकर, रमेश वाघ, संजय भामरे व समस्त सोनार समाज पदाधिकारी व समाज बांधव यांची उपस्थिती लाभली. सूत्रसंचालन केतन सोनार यांनी केले. प्रसंगी रतन कुमार थोरात यांनी उपस्थितांचे आभार मानले.