जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरात श्री संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून शहरातील जळगाव जिल्हा नाभिक संघात श्री संत सेना महाराजांच्या प्राणप्रतिष्ठा करण्यात येऊन पूजन करण्यात आले.
आज संत श्री सेना महाराज पुण्यतिथी सर्वत्र साजरी करण्यात येत आहे. या अनुषंगाने काल सायंकाळी शिवाजीनगर भागातील जिल्हा नाभिक संघात संत सेना महारांच्या प्रतिमेची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तर आज सकाळी पुण्यतिथीच्या मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री गुलाबराव देवकर, महापौर सौ. जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, नाभिक समाज मंडळाचे जिल्हाध्यक्ष कांतीलाल उखा वाघ, उपाध्यक्ष वामन वाघ, सचिव जगन्नाथ वखारे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.