जळगाव (प्रतिनिधी) : येथील जगद्गुरु संत रोहिदास महाराज चर्मकार बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेला माल्यार्पण करून वंदन करण्यात आले.
कार्यक्रम शहरातील राजमालती नगरातील संत रोहिदास महाराज मंदिरामध्ये घेण्यात आला. सुरुवातीला ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यानंतर अध्यक्ष किशोर धोरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती सांगितली.
यावेळी उपाध्यक्ष विजय खजुरे, साहेबराव खजुरे, छोटू धोरे, संतोष धोरे, तुषार अहिरे, आनंद निकम, विजय अहिरे, नीलिमा धोरे, लताबाई धोरे, रेखाबाई अहिरे, सुनीता धोरे, उषा धोरे, प्रेरणा धोरे, गायत्री धोरे आदी समाज बांधव व नागरिक उपस्थित होते.