कॅबीनेट मंत्री अनिल पाटील यांना निवेदन
जळगाव (प्रतिनिधी) : सन २०२५ ह्या शासकीय वर्षापासुन सोनार समाजाचे आराध्य दैवत संत नरहरी महाराज यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी करुन त्यांचा कार्याचा गौरव शासनाने करावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री अनिल पाटील यांना त्यासंदर्भात निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र शासन वर्षभर महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक,शैक्षणिक,वैचारिक जडणघडणीत अत्यंत मौल्यवान भुमिका बजावणार्या संत, महात्मा, समाजसेवक, स्वातंत्र्यसेनानी, राष्ट्रपुरुष यांची शासकीय स्तरावर जयंती साजरी करुन त्यांचा कार्याला/स्मृतींना उजाळा देत असते. शासनाने आतापर्यत समाजातील अनेक महापुरुषांचा शासकीय स्तरावर जयंती साजरा करुन गौरव केला आहे. परंतु यात विठ्ठलांचे निस्सिम भक्त,वारकरी सप्रदायांचे संत शिरोमणी,सोनार समाजाचे आराध्य दैवत असलेले संत श्रेष्ठ श्री नरहरी सोनार यांचा समावेश नाही. तरी सन २०२५ ह्या शासकीय वर्षापासुन सोनार समाजाचे आराध्य दैवत संत नरहरी महाराज यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी करुन त्यांचा कार्याचा गौरव शासनाने करावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री अनिल पाटील यांना त्यासंदर्भात निवेदन नागरिक हर्षल सोनार यांनी दिले.