जळगाव – २४ मार्च २०२५: गोदावरी नर्सिंग महाविद्यालय, जळगाव यांच्या वतीने “संशोधनासाठी लेखन ग्रँट” (Writing for Research Grants) या विषयावर ऑनलाईन वेबिनारचे आयोजन दिनांक २४ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजता ते १२.३५ या वेळेत करण्यात आले. हा वेबिनार Google Meet या प्लॅटफॉर्मवर घेण्यात आला.
या वेबिनारसाठी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. एस. के. बाऱाल, अधिष्ठाता, इंदिरा गांधी नॅशनल ट्रायबल युनिव्हर्सिटी, मध्यप्रदेश यांनी उपस्थित राहून संशोधनासाठी प्रस्ताव लेखन, त्यातील आवश्यक बाबी, शासकीय व खासगी अनुदानासाठीचे तांत्रिक निकष आणि यशस्वी प्रस्ताव लेखनाचे मार्ग यावर सखोल मार्गदर्शन केले.
या वेबिनारसाठी संपूर्ण भारतातून ४२८ जणांनी नोंदणी केली होती, तर सूत्रसंचालन डॉ. प्रियतर्शनी मून यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. हेमांगी मुरकुटे यांनी केले.
कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला असून सहभागी विद्यार्थी, संशोधक आणि शिक्षक वर्गाकडून वेबिनारला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वेबिनारच्या माध्यमातून संशोधन क्षेत्रातील नवउद्योजकांना उपयुक्त दिशा मिळाली.