जळगाव येथे संस्कृत भारतीतर्फे आयोजित संवाद परिषदेतून उमटला सूर
जळगाव –संस्कृत भाषा हि परिस्पर्शासारखी आहे, तिच्यामुळे जीवनाचे सार्थक होते, हि विद्या आणि कला हि आहे. म्हणून संस्कृत आत्मसात करा आणि नंतर ती तुम्हाला प्रगट करेल. जोवर संस्कृत भाषा जीवनात आहे, तोपर्यंतच चैतन्य आहे. त्यामुळे संस्कृत भाषेच्या बाबतीत सकारात्मक राहा, संस्कृत भाषा हि आपली आई आहे, तिला जतन करणे आणि तिचा प्रचार प्रसार करण्याची आज आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मंत्रालयातील वर्ग १ च्या अधिकारी डॉ मंजुषा ताई कुलकर्णी यांनी केले.
निमित्त होते जळगाव येथे आयोजित संवाद परिषदेचे. विविध शाळा महाविद्यालयात संस्कृत भाषा शिक्षणाची सोय कशी उपलब्ध करून देता येईल ? या विषयावर जळगाव जिल्हा संस्थाचालक संघटना, संस्कृत भारती देवगिरी प्रांत आणि गोदावरी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज शनिवार दिनांक १७ मे रोजी जळगाव येथील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात संवाद परिषद आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी संयोजिका संचालिका डॉ. केतकीताई पाटील, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्थाचालक संघटना अमळनेर चे अध्यक्ष श्री जयंतराव पाटील हे होते. त्यांच्यासमवेत व्यासपीठावर मंत्रालयातील वर एक च्या अधिकारी डॉ मंजुषा कुलकर्णी, प्राचार्य डॉ विजयकुमार पाटील, श्री अविनाश दादा हे उपस्थित होते. मान्यवरांसह प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन केले. प्रास्ताविकातून संस्कृत भाषेबद्दलचे महत्त्व सांगून ती सर्वांनी आत्मसात करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले. बालवयातच संस्कृत भाषा शिकविणे गरजेचे असल्याचे नमूद केले. यानंतर डॉ मंजुषा ताई कुलकर्णी यांनी ऋषी मुनींच्या काळापासून असलेले संस्कृत भाषेची महती विविध उदाहरणे देऊन सांगितली तसेच संस्कृत भाषेतून गीत सादर करून मार्गदर्शनाचा समारोप केला. उपस्थित संस्थाचालक, सदस्यांनी संस्कृत भाषा सुरू करण्यासाठी काही शंका, प्रश्न विचारले, त्याचे डॉ मंजुषा ताईंनी समर्पक उत्तरे देऊन समाधान केले. परिषदेचे सूत्रसंचालन प्रा प्र.ह.दलाल यांनी तर आभार प्रदर्शन चिपळूणकर यांनी केले. ब्रजेश पंडित यांनी म्हटलेल्या शांती मंत्राने परिषदेची सांगता झाली. सदर कार्यक्रमास प. पू.महामंडलेश्वर जनार्दन स्वामी यांनी आशीर्वादपर व्हिडिओ पाठविला होतासंस्कृत भारती भुसावळ च्या सदस्यांनी परिषदेचे उत्तम आयोजन केले असून संस्कृत भाषेचा प्रचार प्रसार होण्यास सुरुवात झाली.