पारोळा- आमदार चिमणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज संजय गांधी निराधार समितीची बैठक पार पडली. यावेळी पारोळा तालुक्यातील २०० पात्र लाभार्थ्यांची प्रकरणे मंजुर करण्यात आली. तसेच आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांनी मंजुर कुटुंब अर्थ सहाय्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या कुटुबियांना धनादेश वितरीत करण्यात आले. याप्रसंगी तहसिलदार अनिल गवांदे, समिती सदस्य चतुरभाऊ साहेब पाटील(दळवेल), दिनकर पाटील(शेवगे प्र.ब.), सुभाष पाटील(पळासखेडे), कैलास पाटील(शिरसमणी), लक्ष्मिकांत निकम(उंदिरखेडे), गायत्री महाजन(पारोळा), कल्पना पाटील(पारोळा), लालजी भिल(मंगरूळ),ज्ञानेश्वर पाटील(वेल्हाणे), नायब तहसिल शिंदे साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.
कुटुंबअर्थ सहाय्य योजनेंतर्गत खालील लाभार्थ्यांना प्रत्येकी २०,००० रूपयांचा धनादेश देण्यात आले.
१) चंद्रकला मधुकर पाटील – टोळी
२) सरला शरद मोरे – लोणी
३) अल्काबाई इच्छाराम पाटील – पारोळा
४) यशोदा विजय सोनवणे – म्हसवे
५) रेखाबाई देवाजी भोई – पारोळा
६) अनिता राजेंद्र महाजन – पारोळा
७) प्रतिभा अशोक पाटील – वेल्हाणे खु