मुंबई (वृत्तसंस्था) – ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदारांपैकी फरार केपी गोसावीच्या सहकाऱ्याने एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत. मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने त्यांना खोट्या पंचनाम्यावर सही करायला लावली होती. या प्रकरणात २५ कोटींची डील झाली असा आरोप करत त्यापैकी आठ कोटी वानखेडेंना द्यायच ठरलं होतं, ,प्रभाकर साईल याने केला आहे. यावरून आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.
आर्यन खानचा एक व्हिडिओ ट्विट करत राऊत म्हणाले की, नवा पुरावा समोर आणला आहे. तपास यंत्रणेने साक्षीदारांकडून जबरदस्तीनं कोऱ्या कागदावर सही करुन घेण्याचा प्रकार धक्कादायक असून याप्रकरणात खंडणी मागितल्याचाही आरोप केला जात आहे.
‘महाराष्ट्राला बदनाम करण्याचा कट रचला जात असल्याचा संशय राज्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला होता. तो संशय आता खरा ठरताना दिसत आहे. आर्यन खान प्रकरणात साक्षीदाराला जबरदस्तीनं कोऱ्या कागदावर सही करायला लावणं हे धक्कादायक आहे.
यासोबतच मोठ्या रकमेची खंडणी म्हणून मागणी केल्याचीही माहिती समोर येत आहे. पोलिसांनी याप्रकरणी योग्य दखल घेऊन कारवाई करावी’, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. राऊत यांनी ट्विट गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना टॅग केलं आहे.