जळगाव (प्रतिनिधी ) ;- शिवसेना नेते खा. संजय राऊत यांचे आज सकाळी आगमन झाल्यानंतर त्यांनी सकाळी ११ वाजता पदाधिकारी आणि कार्यकत्यांची बैठक घेतली. बैठकीत उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून त्यांनी जळगाव लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला . यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत ,पालकमंत्री गुलाबराव पाटील ,महापौर जयश्री ताई महाजन , माजी महापौर नितीन लड्ढा ,उपमहापौर कुलभूषण पाटील , जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे,हर्षल माने , महानगर प्रमुख शरद तायडे, यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. .