जळगाव (प्रतिनिधी) – येथील गोदावरी फॉउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाचे बास्केटबॉल खेळाडू सानिका कोकणे आणि युगल धुर्वे यांची महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विदयापिठ संघात निवड व महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगीरी .

सर्व प्रथम क्षेत्रीय निवड चाचणी नाशिक येथे पार पडली यात नाशिक विभागीय संघात दोघांची निवड झाली. या संघाने आंतरक्षैत्रीय स्पर्धेत कोल्हापूर येथे मुुलींनी विजेतेपद पटकावले तर मुलांनी उपात्य फेरीपर्यंत मजल मारली. या दोघांच्या चमकादार कामगीरीमुळे त्यांची महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठ संघात निवड झाली. दि ४ ते ८ डिसेंबर नांदेड येथे महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापिठ क्रिडा स्पर्धा —क्रिडा महोत्सवात मुलींच्या संघात सानिका कोकणे तर मुलांच्या संघात युगल धुर्वे यांच्या चमकदार कामगीरी मूळे मुलांमुलीच्या संघाने तिन्ही सामने जिंकण्याची किमया केली.त्यांच्या कामगीरीमूळे २७ वर्षानंतर प्रथमच या संघाचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश निश्चीत झाला. यात मुलींचा संघ उपांत्यपुर्व फेरी जिंकल्यामूळे उपात्य फेरीत प्रवेश करू शकला तर मुलांना पराभव स्विकारावा लागला.
युगलच्या ३० बास्केट मुळे हा संघ इथपर्यत मजल मारू शकला. मुलींच्या संघात सानिकाने देखिल २२ बास्केट मुळे उपांत्यफेरीमध्ये मजल मारली. दोघांच्या कामगीरी मूळे मुलींचा संघ २४ संघामधून ४ था क्रमांक तर मुलांच्या संघाने ५ वा क्रमांकापर्यंत मजल मारली. त्यांच्या या उकृष्ट कामगीरीमूळे भविष्यातील स्पर्धांसाठी या खेळाडूंना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर संधी मिळू शकते. त्यांना प्रशिक्षक सुरेंद्र गावंडे यांचे मार्गदर्शन लाभले तर त्यांच्या यशाबददल संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील,सदस्या डॉ. केतकीताई पाटील, डॉ. वैभव पाटील, डॉ. अनिकेत पाटील, डॉ. अक्षता पाटील, अधिष्टाता डॉ प्रशांत सोळंके,प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड, यांनी अभिनंदन केले आहे.









