शिरसोली येथे जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक
जळगाव ( प्रतिनिधी ) – ‘महात्मा फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते, तर ते एक विचारमंत्र होते. त्यांनी सत्यशोधक समाज स्थापन करून शोषित-वंचित घटकांना आवाज दिला,’ असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते शिरसोली प्र.न. येथे महात्मा फुले जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
या वेळी पालकमंत्री म्हणाले, ‘महात्मा फुलेंनी शिक्षणाला सर्वोच्च मान दिला. समाजाचा खरा उध्दार शिक्षणातूनच शक्य आहे, हा मंत्र त्यांनी दिला. अज्ञान, अंधश्रद्धा आणि विषमतेच्या अंधकारात सत्य, समता आणि शिक्षणाचे तेज पसरवणारे ते क्रांतिसूर्य होते.’ कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. माळी समाज युवक फाउंडेशनच्या वतीने गावातील मुख्य रस्त्यावरून भव्य मिरवणूक काढून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रा. विजय पाटील यांनी सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक केले. माळी समाज युवक फाउंडेशनचे उपाध्यक्ष प्रकाश माळी यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास माजी सभापती नंदलाल पाटील, माजी सरपंच अनिल पाटील, शेनफडू पाटील, शशिकांत पाटील, माळी समाज युवक फाउंडेशनचे अध्यक्ष अर्जुन माळी, उपाध्यक्ष प्रकाश माळी, प्रणय सोनवणे, ज्ञानेश्वर माळी, कैलास माळी उमाजी पानगडे, रामकृष्ण काटोले, ग्रा. पं. सदस्य ज्ञानेश्वर साबळे, भगवान पाटील, राहुल पाटील, भगवान बोबडे, शिवदास बारी, राजेंद्र फुलवाडे, नाना साबळे, अकील मणियार, बापू मराठे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.