जळगाव ( प्रतिनिधी ) – देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या तरुणाचा दुचाकी अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.हा अपघात ममुराबाद रोड जवळ काल मंगळवारी ४ वाजता घडला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

मुकेश नारायण पाटील (वय-32) रा. समता नगर असे मयत झालेल्या तरुणाचं नाव आहे. नातलगांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुकेश नारायण पाटील राहणार समतानगर आणि सतीश विजय संदांशिव हे दोघे इतर मित्रांसह यावल तालुक्यातील डांभुर्णी गावाजवळ असलेल्या या निंबा देवीच्या दर्शनासाठी काल मंगळवार २० जुलै रोजी सकाळी ११ वाजता दुचाकीने गेले होते. निंबा देवीचे दर्शन घेतल्यानंतर सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास जळगाव घरी परतत असताना ममुराबाद जवळ समोरून येणाऱ्या दुचाकीला कट मारण्याच्या नादात दुचाकी घसरून दुचाकीचालक लोकेशन मुकेश पाटील आणि सतीश संदांशिव हे दोघे जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. यातील गंभीर जखमी झालेल्या मुकेश पाटील यांचा आज सकाळी साडेनऊ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. मयताच्या पश्चात पत्नी सीमा मुलगा कृष्णा दोन भाऊ असा परिवार आहे.







