जळगाव ( प्रतिनिधी )– एरंडोल येथील नगरसेवक प्रमोद महाजन यांची अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या युवक जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ना छगन भुजबळ हे जिल्हा दौऱ्यावर असताना समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांच्या आदेशाने युवक जिल्हाध्यक्ष भूषण महाजन यांनी ही निवड केली. यावेळी विभागीय संघटक अनिल नाळे , विभागीय समन्वयक नितीन शेलार , गजानन महाजन , सागर महाजन उपस्थित होते.







