पोस्टल कॉलनीतील नवदुर्गा मित्र मंडळातर्फे आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) : श्री हरी मंदिर प्रतिष्ठान संचलित नवदुर्गा मित्र मंडळतर्फे सामाजिक कार्यकर्ते मनोज ध्रुवराज वारके यांच्या स्मरणार्थ रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर रविवारी दि. ५ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आले होते. शिबिरात ४५ जणांनी रक्तदान केले.
आरोग्य तपासणीमध्ये ईसीजी, शुगर, डोळे तपासणी करण्यात आली. याचा १३० नागरिकांनी लाभ घेतला. रक्तदान शिबिरसाठी रेडप्लस ब्लड सेंटर तसेच आरोग्य शिबिर रोटरी क्लब ऑफ जळगाव नॉर्थ व महादेव हॉस्पिटल यांच्या माध्यमातून सहकार्य मिळाले. शिबिराचा उद्घाटन प्रसंगी डॉ. केतकी पाटील, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, नवदुर्गा मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कैलास भोळे, चंदन कोल्हे, माजी नगरसेवक गायत्री राणे, माजी नगरसेवक उज्वलाताई बेंडाळे, अजित राणे, किरण बेंडाळे, रिकु चौधरी, डॉ. गणेश पाटील, प्रभाकर पाटील उपस्थित होते.
शिबिराचे यशस्वितेसाठी मंडळ अध्यक्ष गिरीश भोळे, उषाताई बेहरे, चंचलाताई कोल्हे, ज्योती पाटिल, संगीता भोळे, नंदिनी भोळे, उपाध्यक्ष हितेश जावळे, मुकेश महाजन, सूरज चौधरी, राहुल सोनवणे, रितेश पाटील, विष्णू पाटील, पंकज पाटील, रवींद्र पाटील, कपिल पाटील, शैलेंद्र पाटील, जितू भोळे, विनोद महाजन, कुशल महाजन, मयुर भोळे, हर्षल पांडे, आकाश राठोड, विशाल सोनवणे, रवी महाजन, नीरज चौधरी, तपेश चौधरी, यज्ञेश चौधरी, भूषण पाटील मंडळाचे कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.