भडगाव (प्रतिनिधी) – भडगाव तालुका आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. समाधान वाघ यांनी नुकताच पदभार स्विकारला. मावळत्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुचिता आकडे यांच्याकडून त्यांनी पदभार स्विकारत विराजमान झाले.
छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात भडगाव तालुका आरोग्य विभागाची आढावा बैठक झाली. आरोग्य विभागाच्या वतीने डॉ. समाधान वाघ यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच मावळत्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुचिता आकडे यांना निरोप देण्यात आला. कार्यक्रमप्रसंगी
चाळीसगाव तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रशांत पाटील तसेच भडगाव तालुक्यातील सर्व वैद्यकिय अधिकारी, आरोग्यसहाय्यक, समुदाय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्यसेविका, गटप्रवर्तक आदी उपस्थित होते.
कार्यक्रमप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना डॉ. समाधान वाघ यांनी सांगितले की, तालुक्यातील जनतेला चांगली आरोग्यसेवा कशी मिळेल. याबाबतीत आपण सर्व मिळून प्रयत्न करु. तसेच सदरप्रसंगी डॉ. समाधान वाघ यांनी आरोग्य विभागाचा आढावा घेऊन कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. सुत्रसंचलन आरोग्य सहाय्यक श्रीकांत मराठे तर आभार संजय सोनार कळवाडीकर यांनी मानले.