• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सलमान बागवान मृत्यूप्रकरणी चौघांवर गुन्हे दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 22, 2023
in Uncategorized
0

जळगावात जलतरण तलावाच्या

ठेकेदाराचा निष्काळजीपणा भोवला

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममधील जलतरण तलाव येथे एका तरुणाचा पोहताना बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी १८ जून रोजी घडली होती. याप्रकरणी गुरुवारी २२ जून रोजी दुपारी तरुणाच्या मित्राच्या फिर्यादीवरून चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सलमान शकील बागवान (वय २४, रा. जोशीपेठ, जळगाव) हा पोहताना बुडून मृत झाला होता. त्याचा मित्र फैजल जावेद बागवान (वय २०, जोशी पेठ, जळगाव) याने फिर्याद दिली आहे. मयत सलमान, फैजल व त्यांचे मित्र अझहर अकबर बागवान (वय २५), शेख हुजेफा शेख अतिक (वय २०), फरान शाहिद बागवान (वय ३०, सर्व रा. जोशी पेठ, जळगाव) हे दि. १८ रोजी संध्याकाळी रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने पोहण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममधील जलतरण तलाव येथे गेले होते. तेथे ठेकेदार राहुल सूर्यवंशी हे काउंटरवर बसलेले होते. त्यांनी १०० रुपये घेऊन तरुणांना टोकन दिल्यावर ते पोहायला गेले होते.

त्यावेळी जलतरण तलावात सुमारे ५५ ते ६० मुले होती. सदर तलावाचे पाणी अशुद्ध असून त्याचा तळ दिसत नव्हता. सलमान, फैजल व मित्रांची जनरल बॅच असल्याने लाइफकोच नव्हता. तेथे सुरक्षाचिन्हे नव्हती. ५. ४५ वाजता सर्व मुले बाहेर आली. त्यावेळी फैजल, फरान, हुजेफा बाहेर येऊन कपडे बदलायला लागले. मात्र सलमान दिसला नाही. त्यामुळे त्यांनी शोधाशोध केली. तेव्हा तेथे काम करणारा पंकज आणि ठेकेदार राहुल सूर्यवंशी यांनी सहकार्य केले नाही. अखेर काठापासून १० फूट अंतरावर लाईन नं. ६ ते ७ दरम्यान वयस्कर लाईफ गार्डने पाण्यात उतरून तळाशी असलेल्या सलमानला बाहेर काढले. त्याला कृत्रिम श्वासोच्छवास देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही.

मित्रांनी व नागरिकांनी त्याला तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी आणले. तेथे त्यास मृत घोषित केले. त्यानुसार ठेकेदार राहुल विजय सूर्यवंशी, पंकज पवार, यादव महाले व लाईफ गार्ड सुनील चौधरी यांचेविरुद्ध तक्रार दिली आहे. त्यानुसार त्यांचेवर गुन्हा दाखल झाला आहे. तपास सपोनि मीरा देशमुख करीत आहे. दरम्यान, जलतरण तलावाचे राहुल सूर्यवंशी यांना खाजगी कंत्राट दिलेले आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी जलतरण तलावाची पाहणी करून जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहे.

क्रीडा कार्यालयाने वेळीच आपले कर्तव्य पार न पाडल्याने या तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची सुद्धा चौकशी होऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून विभागीय चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते फारूक शेख यांनी केलेली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra#salman-bagvan-mrutu-news/
Previous Post

जिल्ह्यातील दोन गुन्हेगार ‘एमपीडीए’अंतर्गत स्थानबध्द

Next Post

अंमळनेरात घरफोडी, ६१ हजारांचा मुद्देमाल लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अंमळनेरात घरफोडी, ६१ हजारांचा मुद्देमाल लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा
Uncategorized

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक
1xbet russia

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

March 31, 2026
 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ
1xbet russia

 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ

March 31, 2026
… तर मी राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्त होईल
1xbet russia

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

March 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon