पाचोरा तालुक्यातील वाडी-शेवाळे धरणाजवळ घटना
विलास उर्फ गोविंदा मंगेश जाधव (वय ३५) असे मयत तरुणाचे नाव आहे. या हातमजुरी करणाऱ्या तरुणाने झाडाला रुमालाच्या साहायाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे. पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रकाश पाटील व नरेंद्र नरवाडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन विलास जाधव याचा मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी तपासून मृत घोषित केले. साक्री येथील तरुण हा इतक्या लांब कशासाठी व कुणाकडे आला होता. हा प्रश्न अनुत्तरित असून संबंधित तरुणाने गळफास का घेतला? याचा तपास सुरू आहे.