भुसावळ तालुक्यातील साकेगाव जवळ घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- अज्ञात भरधाव वाहनाने रस्ता ओलांडताना जोरदार धड़क दिल्यामुळे ३५ वर्षीय तरुण जागेवरच ठार झाला. हा अपघात रविवारी दि. १ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास महामार्गावर साकेगावनजीक एका पेट्रोलपंपासमोर झाला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
मनोज सुरेश भालेराव (वय ३९, रा. डॉ. आंबेडकर नगर, भुसावळ) असे मयत तरुणाचे नाव आहे. भुसावळ तालक्यातील साकेगाव येथील एका पेट्रोलपंपासमोर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दि. १ डिसेंबरला रात्री १० वाजता मनोज भालेराव हे पायी जात होते. त्या वेळी रस्ता ओलांडत असताना त्याला भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली. नागरिकांनी त्याला खासगी वाहनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मयत घोषित केले. सुरुवातीला अनोळखी असलेल्या तरुणाची जिल्हापेठ पोलिसांनी ओळख पटवली.