भडगाव ( प्रतिनिधी ) – घर सजवून , लक्षमीच्या पावलांनी बाळाचे पाय हळदी कुंकवाने मुखात अत्यंत उत्साहात मुलीच्या जन्माचे स्वागत कजगावच्या महाजन कुटुंबाने केले
कजगाव येथील पत्रकार संजय महाजन यांचे सुपुत्र हर्षदीप महाजन सैन्यदलात आहेत त्यांना काही दिवसांपूर्वी कन्यारत्न प्राप्त झाले त्यांनी आपली मुलगी घरी आल्यानंतर घर सजवून रस्त्यावर फुले टाकून व घरात प्रवेश करतांना लक्ष्मीरूपे पावले हळद कुंकवाने सजवून घरात प्रवेश केला व आनंद उत्सव साजरा करण्यात आला त्यांच्या या स्वागताचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मुलगी वाचेल तरंच प्रगती होईल सवित्रीच्या लेकिना कायम समाजात सन्मानाची वागणूक मिळायला हवी मग ती आई, बहीण ,पत्नी, मुलगी अथवा कुठलीही स्त्री असो तिचा सन्मान झालाच पाहिजे मुलींची संख्या वाढणे ही काळाची गरज आहे असे हर्षदीप महाजन यांनी सांगितले .