जळगाव ( प्रतिनिधी ) – पोलिसांनी आज दुपारी एम आय डी सी भागातील साईनगरात टाकलेल्या धाडीत ९६० रुपयांची बेकायदा देशी दारू जप्त करून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
म.पो. कॉ. अश्वीनी इंगळे यांनी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , आज त्यांच्यासह पोउनि रविंद्र गिरासे, स.फौ. अतुल वंजारी, पो.ना.सुधीर सावळे, पो को सतिष गर्जे, पो. कॉ. गोविंदा पाटील, पो.कॉ. शांताराम पाटील, म.पो.ना. मिनाक्षी घंटे यांना पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी दिलेल्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली . साईनगर, व्ही सेक्टर, एम. आय.डी.सी. येथे सरलाबाई पाटील ही संतोष पाटील याचेकरवी बेकायदा देशी टॅगो पंच दारुची चोरटी विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती . त्यानुसार दुपारी २ वाजता हा छापा टाकण्यात आला पोलिसांनी संतोष दयाराम पाटील ( वय 26 , रा. जुना आसोदा रोड ) याच्या ताब्यातून 960/- रुपये किमतीच्या 180 एम.एल. मापाच्या देशी टँगो पंच कंपनीच्या सिलबंद 16 बाटल्या जप्त केल्या आहेत या आरोपीविरोधात एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .