पुणे (प्रतिनिधी) :- पुण्यातील एका कंपनीतील कर्मचाऱ्यांना रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथे पर्यटनासाठी घेऊन चाललेल्या खासगी बसचा शनिवारी भीषण अपघात होऊन दोन तरुणी ठार, तर ५७ जण जखमी झाले.
पर्यटनासाठी जात असताना ताम्हिणी घाटात (ता. मालगाव) झालेल्या बस अपघातात शहादा तालुक्यातील मंदाणे येथील सुरभी रवींद्र मोरे (वय २२) व कांचन मारुती पाटील (२०, रा. सावरगाव गेट, ता. भोकर, जि. नाशिक) या दोघांचा मृत्यू झाला. पुण्यातील एका कंपनीतील कर्मचाऱ्यांना रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथे पर्यटनासाठी घेऊन चाललेल्या खासगी बसचा शनिवारी भीषण अपघात होऊन दोन तरुणी ठार, तर ५७ जण जखमी झाले.
जखमींमध्ये मंदाणे येथील अन्य दोघांचा समावेश आहे. मंदाणे येथील सुरभी मोरे, लक्ष्मी मोरे यांनी या २० डिसेंबरला पुणे येथील सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर येथील एसीएच प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत मुलाखत दिली होती. त्यात त्यांची निवड होऊन ते २४ डिसेंबरला त्या कंपनीत रुजू झाले होते. त्यानंतर पाच दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर कंपनीची सहल रायगड येथे ठरली तेव्हा सहलीला जात असताना बसचा अपघात झाला.