दहा हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत षटकारा चौकारांच्या आतिषबाजी
संगमनेर (प्रतिनिधी) – राज्यातील क्रीडा स्पर्धांमध्ये लौकिकास्पद असलेल्या संगमनेरच्या सहकार महर्षी T20 चषकासाठी झालेल्या थरारक अंतिम सामन्यात जळगाव जैन स्पोर्टने 4 धावांनी नाशिक क्रिकेट अकॅडमी चा पराभव करून हा मानाचा चषक पटकावला .
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात जय हिंद लोक चळवळ व क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्या वतीने सहकार महर्षी T -20 चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राज्यभरातील 32 संघांनी सहभाग घेतला. अंतिम सामन्याच्या वेळी विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात ,आमदार सत्यजित तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात, उद्योगपती राजेश भाऊ मालपाणी, रामहरी कातोरे ,के,के थोरात, सुधाकर जोशी,कल्पेश मेहता, शैलेंद्र साबळे ,ओंकार सोमानी, राजेंद्र काजळे, नितीन हासे, ॲड सुहास आहेर ,निखिल पापडेजा ,संदीप लोहे ,गिरीश गोरे, अंबादास आडेप, उत्कर्षाताई रूपवते, आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, सहकार महर्षी चषकामध्ये राज्यभरासह देशभरातून खेळाडू सहभागी होतात. ही स्पर्धा देशपातळीवर लौकिकास्पद ठरली असून ज्या संघांनी सहभाग घेतला आणि या स्पर्धा योजनेसाठी ज्यांनी विशेष परिश्रम घेतले .या सर्वांचे अभिनंदन. खेळांमधून अनेक करिअरच्या संधी निर्माण झाल्या असून खेळांमुळे एकात्मता वाढीस लागते. याचबरोबर राज्यभरात आणि देशभरात तुमचे नवीन मित्र निर्माण होत आहेत संगमनेरचे अनेक खेळाडू राज्य व राष्ट्रीय पातळीवर खेळत असून या सर्वांचा आपल्या सर्वांना अभिमान आहे.
तर सत्यजित तांबे म्हणाले की सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी या स्पर्धेला सुरुवात केली आ थोरात यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत भव्य दिव्य व सुंदर अद्यावत स्टेडियम संगमनेर मध्ये झाले असून चोवीस वर्षांमध्ये या स्पर्धा यशस्वीतेसाठी अनेकांनी सहभाग घेतला. हे वर्ष सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांची जन्मशताब्दी वर्ष असून यानिमित्त ही स्पर्धा भव्य दिव्य झाली असल्याचे ते म्हणाले.
या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जैन स्पोर्ट जळगाव 210 धावा केल्या यामध्ये मिरज जोशी यांनी 59 धावा तर शशांक अत्तारदे यांनी 60 धावा ठोकून काढल्या नाशिककडून विवेक ईश्वरवाढ यांनी 2 बळी मिळवले तर जयेश पवार यांनी 3 बळी मिळवले प्रत्युत्तर नाशिकचा संघ 206 धावा करू शकला यामध्ये प्रताप पवार ने कर्णधाराला साजेशी खेळी करत 62 धावा फटकावल्या. तर रवींद्र जाधवने षटकारा चौकारांच्या आतिश बाजी करत 74 धावा केल्या जळगाव कडून रिषभ कारवा 2 बळी घेतले. जळगाव संघाने पहिले पारितोषिक 2 लाख रुपये व सन्मानचिन्ह पटकावले .तर नाशिक अकॅडमी संघाने 1 लाख रुपये रोख व सन्मानचिन्ह पुरस्कार मिळाला. तृतीय बक्षीस एस आर एस संघ मुंबई यांनी जिंकली असून 71 हजार रुपये रोख बक्षीस मिळवले तर 31 हजार रुपयांचे चतुर्थ बक्षीस सेंट्रल रेल्वेने मिळवले.
या या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज सागर मिश्रा याला गौरवण्यात आले तर मॅन ऑफ द मॅच म्हणून शशांक आतारदे याला गौरवण्यात आले.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी ॲड सुहास आहेर ,निखिल पापडेजा, संदीप लोहे, गिरीश गोरे, अंबादास आडेप,नितीन अभंग, गौरव डोंगरे, शेखर सोसे, हैदर अली ,श्रेयस करपे ,विजय उदावंत, रमेश नेहे, जयेश जोशी, हर्षल राहणे ,सुमित पानसरे, कमलेश उनवणे, सुमित काळंगे, हर्षवर्धन सातपुते, एकनाथ श्रीपाद ,अक्षय दिघे, मनीष माळवे , अशीफ तांबोळी, अमोल कवडे ,प्रशांत गुंजाळ, नरेश माळवे ,गणेश गुंजाळ, खालील पिरजादे ,सचिन भालेकर, नवनाथ गायकवाड, जयवंत अभंग यांच्यासह संजय गांधी नगर मधील मित्र परिवाराने विशेष परिश्रम घेतले
प्रेक्षकांची मोठी उपस्थिती
एक जानेवारीपासून सुरू झालेल्या सहकार महर्षी चषकाच्या प्रत्येक सामन्यासाठी संगमनेर मधील क्रीडा रसिकांनी मोठी उपस्थिती दर्शवली. अंतिम सामन्याच्या वेळी किमान दहा हजार युवकांची उपस्थिती होती. यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजी, ढोल ताशांचा गजर यामुळे मैदान दुमदुमून जात होते. अंतिम सामन्यात एकूण 416 धावा षटकारा चौकारांसह पाहायला मिळाल्याने अंतिम सामन्याचा थरार हा अत्यंत संस्मरणीय ठरला..