जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यात शालेय आणि महाविद्यालयीन पातळीवरील खेळाडूंना सरावासाठी क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर सचिव अँड कुणाल पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे
जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , राज्य सरकारच्या नव्या क्रीडा धोरणानुसार क्रीडांगण विकास योजनेतून तलवारबाजी , सॉफ्टबॉल , मिनीगोल्फ आदी खेळांसाठी प्रत्येकी ७ लाखांचे क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यात यावे . कोरोनाकाळात सर्व करता न आल्याने सर्वच खेळाडूंचे नुकसान झाले आहे आता शाळा , महाविद्यालये सुरु झाली आहेत . त्यामुळे खेळाडू विद्यार्थ्यांना या मदतीची अत्यंत गरज आहे
या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर सचिव अँड कुणाल पवार यांच्यासह गणेश निंबाळकर , रोहन सोनवणे , अक्षय वंजारी , गौरव वाणी , भूषण भदाणे , सौरभ पाटील आदींच्या सह्या आहेत.