अमळनेर :- माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाअनेक जणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करायला सुरुवात केली असून आज जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत माजी आ. कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी भाजपला सोडचिट्ठी दिली असून राम राम करून प्रवेश केल्याने तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे .
जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अॅड. ब्रम्हे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यात प्रमुख म्हणजे भाजपाचेच जास्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.








