यावल तालुक्यातील हरीपुरा ते वडरी येथील घटना
यावल (प्रतिनिधी) : येथील पश्चीम क्षेत्र वनविभागाच्या वतीने गुप्त बातमीच्या आधारावरून हरिपुरा वनक्षेत्रात बेवारस सागवान लाकुडच्या पाट्या जप्त केले आहे. एकूण १ हजार ६६० रुपये किमतीच्या पाट्या आहेत.
यावलच्या वन विभागाच्या फिरत्या पथकाने कर्तव्यावर असतांना मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारावर उप वनसंरक्षक जमीर शेख पश्चीम क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल भिलावे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली. हरिपुरा व रोपवन संरक्षण मजुरांसह शासकीय वाहनाने मौजे हरिपूरा ते वड्री रस्त्याने गस्त करीत असताना बेवारस साग चौपट नग लपवलेले दिसून आले. साग चौपट नग ०५ घ.मी. ०.०८२ अंदाजे मालाची किमत रु. १६६० /- जप्त करून शासकीय वाहनाने मु.वि. केंद्र यावल येथे पावतीने जमा केले.
कारवाई पश्चीम वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल भिलावे व वनरक्षक हरिपूरा अशरफ तडवी, वनरक्षक सुधीर पटणे, वनरक्षक अक्षय रोकडे व वाहन चालक शरद पाटील यांनी केली. पुढील तपास अशरफ तडवी वनपाल हरीपुरा (अतिरिक्त कार्यभार) हे करीत आहे.