जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील पिंप्राळा परिसरात संगणकावर जुगार खेळणारे ६ आरोपी रामानंदनगर पोलिसांनी धाड टाकून पकडले आहेत.
पिंप्राळा परिसरात सोमाणी मार्केट जवळच्या शाळेच्या भिंतीला लागून संगणकावर जुगार खेळवला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती काल रात्री १० वाजता पोलिसांनीं ही कारवाई केली . २ पंचांसह टाकलेल्या या धाडीत आरोपीं स्वप्नील शिंदे ( रा – आनंद मंगल नगर , पिंप्राळा ) , महेमूद पिंजारी ( रा – मास्टर कॉलनी ) , प्रवीण पाटील ( रा – गर्जना चौक , पिंप्राळा ), समाधान चौधरी ( रा — गणपतीनगर , पिंप्राळा ) , सत्तू कटारिया , आनंद शिंदे यांना अटक केली आहे , या आरोपींच्या ताब्यातून संगणकाचा सीपीयु , एलईडी आणि एलसीडी मॉनिटर , स्पीकर , माउस , की बोर्ड , कॅल्क्युलेटर , मोबाइलला आणि ८७० रुपये रोख असा २८ हजार ७२० रुपयांचं मुद्देमाल जप्त करण्यात आला
सहाय्यक फौजदार रवींद्र मोरे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून या आरोपींच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंधक अधिनियम १९८७ च्या कलम ४ आणि ५ व भा द वि कलम १०९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.