जळगाव (प्रतिनिधी) – गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संघर्षातून संधीकडे या विषयावर प्रबोधन सत्राचे आयोजन करण्यात आले.
हे सत्र नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (एर्लपी २०२०) अंतर्गत विवाद निराकरण व संघर्ष व्यवस्थापन यावर केंद्रित होते.या चर्चासत्रात बालआरोग्य नर्सिंग विभाग, नागपूर येथील प्रा. कामीनी पिसे यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. त्यांनी संवाद कौशल्य, सहानुभूती आणि सकारात्मक दृष्टिकोनाच्या माध्यमातून संघर्षाचे व्यवस्थापन कसे करावे आणि त्यातून संधी कशा निर्माण करता येतात याचे प्रभावी उदाहरणांसह मार्गदर्शन केले. पुढे बोलतांना त्यांनी संघर्षाचे विविध प्रकार,पातळी संघर्ष टाळण्यासाठीच्या उपाययोजना विषद केल्यात. प्रा. पिसे यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना वैयक्तिक तसेच व्यावसायिक आयुष्यातील अडथळे संधींमध्ये रूपांतरित करण्याची दिशा मिळाली.या सत्रात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. सत्राची संयोजन व आयोजन जबाबदारी नर्सिंग संकुलातील शिक्षकांनी पार पाडली.कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. पिसे यांचे आभार प्रकट करण्यात आले आणि अशा उपक्रमांचे सातत्य ठेवण्याची ग्वाही महाविद्यालय प्रशासनाने दिली.