जळगाव (प्रतिनिधी) – आज काल वाढदिवस असणे म्हणजे बँनर्स, केक, पार्टीस् पण याला अपवाद आहेत. जळगावातील सामाजिक कार्यकर्ते असलेले सागर दिलीप कुटुंबळे. नेहमीच आगळ्यावेगळ्या रंगात वाढदिवस साजरा करणे याचा यांना छंद वाढदिवस साजरा करताना स्वःतासोबत इतरांना आंनद देणे म्हणजे वाढदिवस सत्कार्णी लावणे.

याच अनुषंगाने व पुस्तका सारखा निष्ठावान मित्र नाही! या उक्तीनुसार आजकालच्या मुलांना डोईजड झालेले म्हातारे आई-बाबा ज्या ठिकाणी ठेवतात त्या ठिकाणाना म्हणतात वृद्धाश्रम. असेच जळगावातील केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित मातोश्री वृद्धाश्रम येथे आध्यात्मिक पुस्तकाचे वाटप करून व तेथील आजी-आजोबांसोबत आपला सहवास घडवून आनंदी आनंद निर्माण केला. यावेळी सागर कुटुंबळे व त्यांच्या मित्र परिवाराने रक्तदान सुध्दा केले. यावेळी त्यांच्या सोबत उपस्थित रोशन पाटील, वेदांत नाईक, रोहित कुटुंबळे, अतुल पाटील उपस्थित होते. या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातुन कौतुक होताना आपणास दिसून येते. या उपक्रमातुन सागर कुटुंबळे या तरुणाने एक आदर्श समस्त तरुणाईपुढे निर्माण केला आहे.







