जळगाव (प्रतिनिधी ) ;- कला क्षेत्रातील चमकते तारे तसेच लेखक, गीतकार, दिग्दर्शक,कलाकार म्हणुन प्रसिद्ध असलेले सागर भोगे यांना केटीके आउटस्टँडिंग अचिव्हर्स अँड एज्युकेशन फाउंडेशन आणि हेलियम प्रोडक्शन या दोन्ही ही नामांकित संस्थाच्या अंतर्गत दिल्लीतुन भारत गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.आणि “भारत गौरव पुरस्कार” हा 27 जून ला दिल्लीत दिला जाणार आहे.
चित्रपट दिग्दर्शक क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी आणि उल्लेखनीय योगदाना बद्दल यांची “भारत गौरव पुरस्कार” या साठी निवड झाली असून
हे अत्यंत गरिबीतून वर आले आहेत. त्यांनी आपलं करिअर शून्यातून उभं केलं. म्हणजे की त्यांनी आतापर्यंत १७ मराठी लघुपट, हिंदी वेबसेरीस व मराठी वेबसेरीस तसेच हिंदी गाणे व मराठी गाणे आपल्या नावावर झळकावले आहेत.
अन् याच परिस्थितीची जाणीव ठेऊन त्यांनी पर्ण, पावटी, रोल मॉडेल असे लघुचित्रपट समाज जीवनावर आधारित तसेच समाजाला चटका देणारे हे समाजापुढे आणले आहेत. आता नुकताच भारत गौरव पुरस्कार यांना घोषित करण्यात आला आहे.जो की उत्तम दिग्दर्शक या कार्याला मिळाला आहे.