सफाई मजदूर संघाचे आयुक्तांना दिले निवेदन

जळगाव (प्रतिनिधी) – महानगर पालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग तात्काळ लागू करावा, यासह विविध मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय सफाई मजदूर संघातर्फे मनपाच्या आयुक्तांना शुक्रवारी २३ ऑक्टोबर रोजी निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, कोरोना काळात सफाई कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम केले. त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि राज्यात इतरांप्रमाणे जळगाव मनपामध्ये देखील कर्मचाऱ्यांना सातवा वेताब आयोग तात्काळ लागू करावा. तसेच महागाई भत्त्याची रक्कम थकबाकी असून कर्मचाऱ्यांना ती तात्काळ अदा करावी. दिवाळीपूर्वी मासिक वेतन लवकर मिळावे. त्यांना दोन महागाई भत्त्याची फरकाची रक्कम व मासिक वेतन दिवाळीपूर्वी अदा करण्यात यावे. या मागण्यांवर लवकर विचार करावा अन्यथा पुढील काळात आंदोलन केले जाईल, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष अजय घेंगट यांची सही आहे.







