सदर गुन्हयाचे तपासात सायबर पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी व त्यांचे अधिनस्त पोउपनि दिगंबर थोरात, पोहेका/ राजेश चौधरी, पोकों/मिलिंद जाधव, पोकों/ गौरव पाटील, पोकों/दिपक सोनवणे यांनी तपासाचे अनुषंगाने संबधीत बैंक व मोबाईल कंपनी यांचेकडेस पत्रव्यवहार करुन आवश्यक माहीती प्राप्त केली. माहीतीचे बारकाईने विश्लेषण करुन यातील संशयित आरोपी हे राजस्थान राज्यातील भिलवाडा येथील असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस अधीक्षक यांचे आदेशाने सदर गुन्हयातील संशयित आरोपी यांना पोउपनि दिगंबर थोरात, पोहेका राजेश चौधरी, पोहेकों/प्रविण वाघ, मपोहेकों/दिप्ती अनफाट व पोकों मिलिंद जाधव अशा पथकाने राजस्थानातील भिलवाडा येथे शास्त्रीनगर येथून अटक केली.
चंदाकुमारी उर्फ तानिया सत्यनारायण शर्मा (वय-३०) व भरत सत्यनारायण शर्मा, (वय-२७, भिलवाडा, राजस्थान) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांचेकडुन ४८ वेगवेगळ्या बँकेचे चेकबुक, २० वेगवेगळ्या बँकेचे एटीएम कार्ड, वेगवेगळ्या कंपनीचे २ मोबाईल फोन, ५ सिमकार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयित आरोपीतांना न्यायालय, जळगाव येथे हजर केले असता त्यांना गुन्हयाचे तपासाचे अनुषंगाने ५ दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड सुनावण्यात आली आहे. सायबर पोलीस स्टेशन जळगाव कडून “केसरीराज” च्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे की, अनोळखी फेसबुक, इन्स्टाग्राम व टेलिग्राम खात्याचे फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारु नये वा त्यांचेशी चॅटींग करु नये, त्यांनी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही आमिषाला बळी पडून पैशाचा व्यवहार करु नये.