रामानंदनगर पोलिसांची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील रामानंद नगर पोलिसांनी विक्रीच्या उद्देशाने आणलेला १३ हजार ६०० रुपये किमतीचा गांजा जप्त करत संशयित आरोपी रमेश बाबासाहेब झेंडे (वय-५४, रा. राजीव गांधी नगर) याला अटक केली आहे. याप्रकरणी ३१ मे रोजी पहाटे ४ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील हरिविठ्ठल परिसरात एक व्यक्ती विक्री करण्यासाठी गांजा घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पोलीस निरीक्षक गुंजाळ यांनी तात्काळ पावले उचलली आणि एक विशेष पथक तयार केले. या पथकामध्ये सपोनि संदीप वाघ, संदीप पाटील, पोउपनि संजय शेलार, पोहेकों जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, सुशील चौधरी, प्रवीण भोसले, प्रमोद पाटील, रेवानंद साळुंखे, मनोज सुरवाडे, अतुल चौधरी, विनोद सूर्यवंशी, रवींद्र चौधरी, उमेश पवार, अजित शहा, प्रवीण सुरवाडे, दीपक वंजारी, अनिल सोननी, आशा गायकवाड, शिला गांगुर्डे यांचा समावेश होता.
पोलिस पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे राजीव गांधी नगरात सापळा रचला. त्यांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने तपास करत, अखेर रमेश झेंडे याला गांजासह रंगेहाथ पकडले. त्याच्या ताब्यातून १३ हजार ६०० रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, रमेश बाबासाहेब झेंडे याला अटक करण्यात आली आहे.