मुंबई ( वृत्तसंस्था )संजय राठोड यांनी राजीनामा दिला असून याप्रकरणात गलिच्छ राजकारण केले जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सायंकाळी पत्रकार परिषदेत केला . माजी वनमंत्री संजय राठोड यांच्याबाबत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले कि , सरकार चालविताना मुख्यामंत्री , मंत्रिपद झाल्यानंतर प्रत्येकाने न्यायाने वागायचे असते तीच भूमिका आमची आहे . तपास हा निःपक्षपातीपने व्हायला पाहिजे हि आमची भूमिका आहे यावेळी संजय राठोड यांच्या आणि पूजा चव्हाण यांच्या आई वडिलांचे भावना व्यक्त करणारे पत्र वाचण्यात आले .
उद्यापासून महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे . मागील कोव्हीडचेमुळे अधिवेशन वाया गेले. अजून कोरोनाचे संकट गेलेले नाही . दुसरी लाट थोपविण्याचा आपण प्रयत्न करीत असून उपचारासाठी शासन सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे . कोरोना काळात भ्रष्टचार वाढला आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांना पत्रकार परिषदघेऊन हा आरोप केला असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत दिली . पुढे बोलताना ते म्हणाले कि , . त्यांनी काही आरोप केले त्याची कीव करावीशी वाटते . कीव एवढ्यासाठी वाटते कि धारावी पॅटर्नचे कौतुक जगभरात झाले आहे त्याचे तुम्ही कोरोना योद्धांचा आरोप करीत आहे. सगळ्यांची उत्तरे देण्यासाठी मी बंधनकारक नाही . सीमा प्रश्नाचं हा प्रश्न का सोडविला नाही . तुम्ही सोबत असाल तर सीमा प्रश्न सुटू शकेल . याद्वारे आरोप करून बोलाची कधी आणि बोलाचाच भात असे करू नये . सगळे विषय मी काही घेत नाही . त्यांनी मला फुकटचा सल्ल्ला दिला आहे हे राज्याला कळले आहे. पेट्रोल डिझेल ची सेंच्युरी वाढविली आहे .