जळगाव (प्रतिनिधी ) जळगाव शहरातील विसनजी नगर भागात असणाऱ्या तायडे गल्लीत तिसऱ्या मजल्यावरील घराला आग लागल्याची घटना आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली असून यात हजारो रुपयांचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. एका अग्निशामक बंबाने आग आटोक्यात आली .
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , आज दुपारी तायडे गल्लीत ३ ऱ्या मजल्यावर विनोद गंगवाल यांच्या घराला आग लागली . याला आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम करतांना विश्व्जीत घरडे, तेजस जोशी,राजू चौधरी,नितीन बारी,प्रकाश चव्हाण,सोपान जाधव, गंगाधर कोळी,युसूफ पटेल, आदी कर्मचाऱयांनी आग त्वरित विझवून आगीवर नियंत्रण मिळवले .