भुसावळ-तालुक्यातील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या समाधानकारक पावसामुळे काल दि.२४ जुलै शुक्रवार रोजी दुपारी १ वाजता हतनूर धरणाचे २५ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले होते आता ते आज दि.२५ जुलै रोजी सकाळी ७ वाजता १ मीटर उघडण्यात आले आहे. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील बर्हाणपूर, देडतलाई, टेक्सा यासह अन्य भागांमध्ये पाऊस सुरू असल्याने धरणात सातत्याने पाण्याची आवक वाढत असल्याने धरणाचे दरवाजे सातत्याने उघडून तापीनदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने तापी नदीला मोठा पुर आला आहे. धरणातून प्रति सेकंद ८८८ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग होत असून धरणाची जलपातळी ३१३६४.०० मीटर तर जलसाठा १८०.०० एमएम क्यूब इतका आहे.








