जळगाव ;- विवेकानंद प्रतिष्ठान संचलित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये इयत्ता पहिलीच्या मुलांना आपले मदतनीस हा विषय देण्यात आला होता दुसरी च्या विद्यार्थ्यांसाठी निसर्ग ही थीम देण्यात आली होती लहान मुलांनी झाडे ,ढग, डॉक्टर ,शिक्षक ,असे वेगवेगळे वेश परिधान करून ऑनलाइन पद्धतीने आपली कलेची सादरीकरण केले ऑनलाइन फॅन्सी ड्रेस उपक्रम राबवण्याची कल्पना शाळेचे प्राचार्य अमित सिंह भाटिया, समन्वयिका स्वाती आहीराव यांनी मांडला या कार्यक्रमाचे नियोजन प्रदीप पाटील यांनी केले इयत्ता पहिली व दुसरीच्या शिक्षकांनी ऑनलाईन पद्धतीत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.