जळगावातील खंडेराव नगर परिसरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील खंडेराव नगर परिसरात रेल्वे रूळ ओलांडताना एका तरुणाचा रेल्वेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला आहे. हि घटना रविवारी २४ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रविंद्र अशोक मिस्तरी (शिरसाट, वय ३९, रा. हरिविठ्ठल नगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. रविवारी तो मजुरीचे पैसे घेण्यासाठी जात होता. तेव्हा खंडेराव नगर ते गणपती मंदिरादरम्यान असलेला रेल्वे रूळ ओलांडत असताना त्याला रेल्वेचा धक्का लागला. आजुबाजुंच्या नागरिकांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी आणले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रविंद्र मिस्त्री यांचे पश्चात आई, वडील, ३ बहिणी असा परिवार आहे.