
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ;- दिल्ली सरकारचे स्वास्थ्य मंत्री सत्येंद्र जैन आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांनी इब्राहिमपूर स्थित सावन कृपाल रुहानी मिशन चे सत्संग केंद्र कृपाल आश्रम – संत दर्शन सिंह जी धाम मध्ये लवकरात-लवकर १ हजार बेड असलेले कोविड केअर सेंटर उघडण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना च्या या दुसऱ्या लाटेमध्ये महामारी शी संघर्ष करत असलेल्या हजारो लोकांकरिता, ही एक आशादायी बातमी आहे. परम पूजनीय संत राजिन्दर सिंह जी महाराज यांच्या अपार कृपेने, सावन कृपाल रुहानी मिशन, दिल्ली द्वारा कोरोना संकट काळात, या रोगाने ग्रस्त असलेल्या पीडितां करिता जास्तीत जास्त मदत केली जात आहे.
मिशनच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, दिल्ली चे स्वास्थ्य मंत्री श्री सत्येन्द्र जैन, बुराडीचे विधायक श्री संजीव झा व डी. एम. यांनी इब्राहिमपुर स्थित कृपाल आश्रम – संत दर्शन सिंह जी धाम चा दौरा केला आणि दिल्ली सरकार द्वारे सुरू करण्यात येणाऱ्या 1000 बेडच्या कोविड केअर सेंटरला आपली स्वीकृती प्रदान केली. याचा प्रारंभ लवकरात लवकर करण्यात येईल, ज्यामुळे आता हजारो लोकांना कोरोना महामारी चा इलाज करण्यासाठी इकडे-तिकडे भटकावे लागणार नाही. याप्रसंगी वार्ड क्रमांक 6 आणि वॉर्ड क्रमांक 7 चे वरिष्ठ अधिकारी सुद्धा उपस्थित होते. या संकटकालीन प्रसंगी सावन कृपाल रूहानी मिशन चा मानव सेवेचा वास्तविक उद्देश्य सार्थक झाला.
मागील वर्षी सन 2020 मध्ये कोरोना महामारी च्या काळात, सावन कृपाल रूहानी मिशन द्वारे देशभरातील बऱ्याचशा राज्यातील प्रमुख शहरांमध्ये साधारणतः 300 सेंटरच्या माध्यमातून आपल्या स्थानीय / जिल्हा प्रशासनाच्या अनुमतीने, हजारो गरीब व गरजू परिवारांना दररोज आवश्यक खाद्य सामग्री, अन्य आवश्यक सामग्री तसेच भोजनाचे वितरण केले गेले.
संत राजिन्दर सिंह जी महाराज यांच्या सानिध्यात कार्यरत, सावन कृपाल रूहानी मिशन हे नैसर्गिक आपत्तीच्या समयी मानव सेवा कल्याणाकरिता सदैव तत्पर राहते.







