जळगाव ( प्रतिनिधी ) – रुग्णालयासमोर उभी केलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शहरात महिनाभरापूर्वी घडली होती या गुन्ह्यातील २ आरोपींना एम आय डी सी पोलिसांनी पकडले आहे.
तालुक्यातील शिरसोली येथील रहिवाशी ज्ञानेश्वर पाटील हे जैन इरिगेशनमध्ये नोकरी करतात . त्यांची मुलगी सिद्धिविनायक रुग्णालयात दाखल केलेली होती. मुलीची तब्येत पाहून अर्ध्या तासाने परत आल्यावर त्यांची नोटारसायकल ( एम एच १९ – सी जी १५ ९१ ) चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले होते त्यांनी एम आय डी सी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती .
या गुन्ह्यातील आरोपी अभिषेक नंदलाल मिश्रा ( भुसावळ ) व निखिल जितेंद्र ठाकरे ( भुसावळ ) यांना तपासानंतर पोलिसांनी अटक केली आहे.