जळगाव ( प्रतिनिधी )– ऍक्टीव्हाच्या हस्तांतरणासाठी लाच मागणार्या उप प्रादेशीक परिवहन कार्यालयातील पंटरच्याविरोधात तक्रारदाराच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.त्यामुळे आता आरटीओ कार्यालयातील लाचखोरी पुन्हा चर्चेत आली आहे .
या लाचखोरीत आरटीओ कार्यालयातील कर्मचार्यांचा सहभाग असण्याची शक्यता असून संशयितांची संख्या वाढू शकते. आरटीओ कार्यालयात पैसे दिल्याशिवाय कामे होत नाहीत अशी चर्चा नेहमीच ऐकायला मिळते . या कार्यालयात कामाच्या महत्वाप्रमाणे पैसे घेतले जातात . आरटीओ दलाल हे लाचखोरीमुळे बदनाम असले तरी ‘ बुरा है मगर धंदा है ‘ असे समर्थन त्यांच्या कामाबद्दल सामान्य माणूसपण करू लागला आहे . बऱ्याचवेळा तर अशीही चर्चा होते की समाधीत अधिकाऱ्यांनीच त्यांच्या विश्वासातील लोकांना अशा लाचेची मागणी करण्याचे काम सोपवलेले असते आलेल्या पैशातून अशा पंटर लोकांनाही त्यांचा वाटा दिला जातो या पंटर लोकांना टाळून कामासाठी प्रयत्न करणाऱ्यांना व्यवस्थित माहिती दिली जात नाही किंवा त्यांना हेलपाटे मारायला भाग पडले जाते आणि पंटर लोकांच्या मार्फत काम दिले तर फारशा अडचणी न येत कामे पूर्ण केली जातात .
या खात्यातील ‘ उघड गुपित ‘ असलेला हा लाचखोरीचा त्रास जणू लोकांच्याही अंगवळणी पडलेला आहे , त्यामुळे फारशा तक्रारी कुणी करत नाही . कधीतरीच केली जाणारी अशी तक्रारसुद्धा मग चर्चेचा विषय ठरते .