उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांची माहिती
जळगाव (प्रतिनिधी) : प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगावच्या वायुवेगाने पथकामार्फत तपासणी दरम्यान तडजोड शुल्क, मोटार वाहन कर, पर्यावरण कराच्या थकीत करापोटी चाळीसगाव आगारात एकूण २६अटकाव करुन ठेवलेल्या वाहनांपैकी १५.जुलै २०२४ रोजी ७ ऑटोरिक्षा वाहनांची ऑफलाईन लिलाव प्रक्रिया पार पाडण्यात आलेली असून, उर्वरित १९ वाहनांपैकी १५ वाहनांची ई-लिलाव प्रक्रिया करण्याचे ५ ऑगस्ट, २०२४ रोजी प्रस्तावित करण्यात आलेले होते.
परंतु काही तांत्रिक कारणास्तव सदरची ई-प्रक्रिया पुढे ढकलण्यात आलेली असून, ई-लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच आपणास त्याबाबत अवगत करण्यात येईल, असे आवाहन मोटार वाहन निरीक्षक तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी (अ.का.) यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.