जळगाव,;- सारथी विषयक सेवांकरीता ई-साईन सुरु करण्यात आली असून ई-स्वाक्षरी सेवेचा लाभ घेणे हे अर्जदारास ऐच्छिक असून प्रत्येक अर्जाकरीता रु 2/- + जीएसटी असे शुल्क आकारण्यात येणार आहे. अनुज्ञप्ती विषयक अर्ज व त्यासोबत जोडावयाचे सर्व कागदपत्रे ई- स्वाक्षरी करता येणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांनी दिली आहे.
अर्जदाराने ऑनलाईन अर्ज भरावा, कागदपत्रे अपलोड करावयाच्या आधी अर्जदाराने सर्व कागदपत्रे ई- स्वाक्षरी चा पर्याय निवडावा. पर्याय निवडल्यानंतर अर्ज व त्यासोबत जोडण्यात आलेले सर्व कागदपत्रे आधार क्रमांकाचा वापर करुनच ओटीपी आधारे ई- स्वाक्षरी करण्यात यावी. यानंतर अर्जदाराने ऑनलाईन पेमेंट करावे व आवश्यकतेनुसार अपॉईटमेंट घ्यावी. ज्या प्रकरणांमध्ये अर्जदाराने ई- स्वाक्षरी चा वापर करुन अर्ज दाखल केला असेल त्या प्रकरणांमध्ये अर्जदारास कार्यालयात अर्ज व त्यासोबतची कागदपत्रे जमा करण्याची आवश्यकता नाही. या प्रकरणांमध्ये अर्जदारास अनुज्ञप्ती प्राधिकारीसमोर अनुज्ञप्ती चाचणी देण्याकरीता यावे लागणार आहे. अर्जदाराने ई- स्वाक्षरी केल्यानंतरही त्यास अनुज्ञप्ती चाचणीकरीता कार्यालयामध्ये यावे लागणार आहे.ई- स्वाक्षरी प्रणालीमुळे अर्जदारास पुन्हा कार्यालयात कागदपत्रे साक्षांकित करुन सादर करण्याची आवश्यक राहणार नाही. तसेच त्यामुळे नागरीकांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. लोही यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.







