चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- शहरातील गायत्री कॉम्लेक्स जवळ रस्त्यावर उभी असलेल्या मोटार सायकलवर वाहतुक पोलीसाने ऑनलाईन दंड टाकल्याचे राग आल्याने, दुचाकी मालकाने वाहतुक पोलिसांची शर्टाची कॉलर पकडली व लाथाबुक्कानी मारहाण करून दुखापत करून शिवीगाळ केली. हि घटना दि. २७ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाहतुक शाखेचे पोना. चहल शिवाजी जाधव हे दि. २७ रोजी ड्युटी असल्याने वाहतुक नियंत्रित करीत होते. चाळीसगांव शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक, गायत्री कॉम्लेक्सजवळ सकाळी ११ वाजेच्या सुमारास राधे भोजनालयसमोर रोडवर मध्यभागी होंडा ड्रीम योगा कंपनीची मोटार सायकल लावलेली होती. पोलीस नाईक यांनी मोटार सायकलच्या मालकाचा शोध घेतला. परंतु तो मिळुन न आल्याने सदर दुचाकीवर ऑनलाइन दंडात्मक कार्यवाही केली. तेथे ११.२० वाजता मोटारसायकल मालक संजय बसंत पवार (वय २५ वर्षे रा. चौधरीवाडा) हा दारुच्या नशेत आला.
तेव्हा पो. नाईक यांनी त्याचे नाव गाव विचारले. तेव्हा त्यांने त्यांचे नाव संजय वसंत पवार असे सांगितले व गाडीवर कार्यवाही का करतात असे पो. नाईक यांना एकेरी भाषेत अरेरावी करुन शिवीगाळ करायला लागला. तसेच शर्टाची कॉलर पकडली व लाथाबुक्कानी मारहाण करून दुखापत करून शिवीगाळ केली.
याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला पोना. चहल शिवाजी जाधव यांच्या फिर्यादीवरुन सरकारी कामात अडथळा आणला म्हणून संजय बसंत पवार यांच्याविरोधात गुन्हां दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.









