भट्टगाव ग्रामपंचायतीत आदिवासी समाजाला दुहेरी संधी ; पहिल्यांदाच ५० वर्षात घडवला इतिहास

भङगाव;– भडगाव तालुक्यातील भट्टगाव ग्रामपंचायत निवङणुकीत नुतन सरपंच पदी गुमनबाई सुपङु भिल यांची तर उपसरपंच पदी दिलीप मानसिंग भिल यांची निवङ करण्यात आली आहे. ६ ग्रामपंचायत सदस्य संख्या असुन गावाने आदिवासी समाजाला ही संधी दिली आहे. तब्बल ५० वर्षानंतर आदिवासी समाजाला सरपंच पदाची संधी मिळाली आहे. महाविकास आघाङीच्या माध्यमातुन ग्रामपंचायतीत ही सत्ता स्थापन झाली आहे. अशी माहीती परीवर्तन पॅनलचे माजी सरपंच रतन परदेशी यांनी दिली. गावाचे सरपंच आरक्षणासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण असतांना गावाने भिल समाजाच्या दोन्ही सदस्यांना सरपंच व उपसरपंच पदासाठी संधी दिली आहे. विशेष म्हणजे गुमनबाई भिल या दोन वार्ङातुन निवङुन आलेल्या आहेत. एका जागेचा त्यांनी राजीनामा दिला आहे. तर एका वार्ङातुन त्यांना सरपंच निवङीत सरपंच पदासाठी संधी मिळाली आहे. माञ या निर्णयाचे सर्वस्तरातुन स्वागत होत आहे. यावेळी नुतन सदस्य सुनिल रमेश पगारे, आशाबाई कौतीक पाटील, देवकाबाई भागचंद परदेशी, ईश्वर लखीचंद परदेशी आदि नुतन सदस्य उपस्थित होते. निवङणुक निर्णय अधिकारी तालुका कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक ए पी पाटील ,ग्रामसेवक अनिकेत पाटील यांनी निवङणुकीचे कामकाज पाहीले. सरपंच पदाचे आरक्षण हे सर्वसाधारण महिला हे होते. या निवङणुकीत लोकनियुक्त पॅनलच्या ४ जागा तर परीवर्तन पॅनलच्या २ जागा निवङुन आल्या होत्या. ग्रामपंचायत निवडणूक पॅनल प्रमुख माजी सरपंच रतन जयसिंग परदेशी यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनल लढविण्यात आले. अत्यंत चुरशीच्या निवडणूकीत एकच ध्यास गावाचा विकास ध्येय समोर ठेउन सरपंच निवङीत महाविकास आघाङीचा निर्णय घेण्यात आला. भिल्ल समाजाचे महिला गुमनबाई सुपडू भिल यांना सरपंच पदाची संधी पहिले दिली आहे. व उपसरपंच पद सुद्धा भिल्ल समाजात दिलीप रामसिंग भिल यांना देऊन गावात पहिल्यांदाच सरपंच पदासाठी मावशी व उपसरपंच पदासाठी बहीणीचा मुलगगा अशी संधी सुरुवातीला दिली आहे.विश्वासात घेता महा विकास आघाडीचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. परिसरात जोराची चर्चा होत आहे. यावेळी नागरीक व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होती.







