पारोळा ;- टिटवी(ता.पारोळा) येथील रहीवाशी व करमाड माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक सतीश दशरथ पाटील यांनी वडील तथा टिटवी शाळेचे माजी मुख्याध्यापक कै. दशरथ गजमल पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ शाळेचा एक वर्ग पूर्ण डिजिटल करून दिला आहे,त्यात टेबल लाईटफिटींग,आभ्यासक्रमाचे पेनड्राईव आणून चांगल्या प्रतीचे रंग व पेंटर आणून उत्तम डिजिटल वर्ग बनवून दिला आहे. त्यांचे वडील कै, दशरथ पाटील याच शाळेत पाच वर्षे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. जि प टिटवी शाळा तालुक्यात आदर्श शाळा निर्माण व्हावी असा त्यांचा मानस आहे. या डिजिटल वर्ग खोलीचे उदघाटन गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा कृ.उ.बा.समितीचे मा.सभापती विजय सुदाम पाटील यांनी केले.उर्वरित अजून दोन वर्ग डिजिटल करण्यास आर्थिक मदत करावी असे आव्हान शाळेचे शिक्षक नितीन चौधरी यांनी यावेळी केले
या प्रसंगी गावाचे पोलीस पाटील विनोद पाटील,सतिष पाटील, मा ग्रा.प. सदस्य उदय पाटील, नवनिर्वाचित ग्रा.प. सदस्य दगडू आबा पाटील ,लोमेश पाटील, मुख्याध्यापक प्रीती पाटील, कैलास गव्हाणे ,प्रतापसिंग राजपूत उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नितिन चौधरी यांनी तर आभार कैलास गव्हाणे यांनी व्यक्त केले.