जळगाव (प्रतिनिधी) – शिवकॉलनी येथील संत तुळशी विद्या प्रसारक मंडळ संचलित सरस्वती विद्या मंदिर येथे रोटरी ईस्ट जळगावतर्फे संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन गुरुवार दिनांक १ जुलै रोजी करण्यात आले.
प्रत्येक विद्यार्थ्याला काळानुरूप शिक्षण मिळावे, तंत्रज्ञानाच्या युगामध्ये तो तंत्रसाक्षर व्हावा या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ जळगाव तर्फे हा उपक्रम घेण्यात आला. शाळेला १० संगणक आणि १ लॅपटॉप प्रदान करण्यात आले आहे. याचा लाभ सुमारे ७०० विद्यार्थ्यांना होणार आहे. लॅबचे उद्घाटन उपशिक्षणाधिकारी डॉ. डी. एम. देवांग यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळावं यासाठी हे डिजिटल क्लासरूम महत्त्वाची भूमिका पार पाडेल असे यावेळी डॉ. डी. एम. देवांग यांनी सांगितले.
यावेळी सह प्रांतपाल विष्णू भाऊ भंगाळे , संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटिल, अध्यक्ष सीए वीरेंद्र छाजेड , सचिव प्रणव मेहता , सुशील असोपा,धवल टेकवानी, डॉ जगमोहन छाबडा , डॉ राहुल भंसाली , सुनील शहा, राजेश सांखला , संग्रामसिंह सूर्यवंशी, संजय शहा, प्रीतीश चोरडिया, संजय गांधी अमर चौधरी कातांई नेत्रालय यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.