२४० रुग्णांना मोफत चष्मे तर ८० रुग्णांची होणार शस्त्रक्रिया
जळगाव (प्रतिनिधी) :- रोटरी क्लब जळगावच्या वतीने धानोरा येथील झि. तो. महाजन माध्यमिक विद्यालय व ना. भा. पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये नुकतेच विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा धानोरा, पारगाव, देवगाव, किनगाव, चिंचोली, गिरडगाव, मोहरद, डांभुर्णी, अडावद परिसरातील ६३० रुग्णांनी लाभ घेतला तर त्यांच्या १२०० हुन अधिक विविध तपासण्या करण्यात आल्या.
यात डोळे, दात, हाडे, बीपी, शुगर, त्वचा रोग, स्त्रिया व बालकांच्या तपासणीचा समावेश आहे. जवळपास ५३० हुन अधिक नागरिकांनी डोळे तपासणीचा लाभ घेतला त्यातील २४० रुग्णांना लगेच विनामूल्य चष्मे देण्यात आले तर ८० रुग्णांच्या लवकरच जळगाव येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. सुमारे ५८० रुग्णांना विनामूल्य औषधी वितरित करण्यात आली आहे. रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष मनोज जोशी, मानद सचिव ॲड. हेमंत भंगाळे, मेडिकल कमिटी चेअरमन डॉ. तुषार फिरके यांनी ग्रामस्थांचे धन्यवाद व्यक्त केले.
सकाळी ९ वाजता सुरु झालेल्या या आरोग्य तपासणी शिबिरात रोटरीचे माजी प्रांतपाल बालरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर सिकची, जनरल तपासणीसाठी डॉ. सुनील सूर्यवंशी, डॉ. पराग जहागिरदार, डोळ्यांच्या तपासणीसाठी डॉ. तुषार फिरके, डॉ. हेमंत बाविस्कर, दातांच्या तपासणीसाठी डॉ. पवन बजाज, स्त्रियांच्या तपासणीसाठी डॉ. सुमन लोढा व डाॅ. साधना पाटील, हाडांच्या व सांध्यांच्या तपासणीसाठी डॉ. ज्ञानेश पाटील, डॉ. निवेदिता प्रसाद, डॉ मयंक चौबे, आदींनी सहभाग घेतला. त्यांना वैद्य जयंत जहागिरदार, डॉ. काजल फिरके, डॉ. महेश पाटील आदींनी सहकार्य केले.
नोंदणी व रुग्णांची व्यवस्था ॲड. हेमंत भंगाळे, संदीप गुजर, वासुदेव महाजन, पराग अग्रवाल, चंदन महाजन, रितेश जैन, योगेश चौधरी, विश्वजित बऱ्हाटे, पंकज जयस्वाल, आकाश डोकनिया, शाम अग्रवाल यांनी पाहिली. औषधी वाटपाची व्यवस्था विजय जोशी, जय जोशी व चंद्रकांत सुर्वे, अमोल मोरे, हर्षल पवार, नितीन कुलकर्णी यांनी केली. इतर व्यवस्था रो. जितेंद्र ढाके, ॲड. सागर चित्रे, रो. प्रदीप खिवसरा, तेजस पवार, विनया जोशी, डाॅ. शुभदा कुळकर्णी, डाॅ. प्रज्ञा जंगले यांनी पहिली.
याप्रसंगी झि. तो. महाजन माध्यमिक विद्यालयाचे चेअरमन प्रदीप महाजन, ज्येष्ठ संचालक बी. एस. महाजन, वामनराव महाजन, योगेश पाटील, बाजीराव पाटील, जगदीशकुमार पाटील, सागर चौधरी, एस. पी. महाजन, डाॅ. मन्साराम महाजन, माणिकचंद महाजन, अशोक महाजन आदी उपस्थित होते. कुलदीप महाजन, राजेंद्र पाटील, संतोष कोळी, उमाकांत पाटील आदींनी सहकार्य केले.