धरणगाव तालुक्यातील चांदसर येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- ट्रॅक्टरला रोटाव्हेटर जोडत असतांना अचानक रोटाव्हेटर सुरू झाल्याने ५९ वर्षीय शेतकऱ्याचा पाय अडकल्याने गंभीर जखमी झाल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यापुर्वी त्यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.
रमेश सुखा कोळी (वय ५९ रा. चांदसर ता.धरणगाव) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी हिराबाई, दोन मुलं नामदेव व वासुदेव आणि सुना नातवंडे असा परिवार आहे. शेती करून ते उदरनिर्वाह करतात.(केसीएन)शुक्रवारी दिनांक १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता चांदसर गावातील कृषी विद्यालयाच्या परिसरात ट्रॅक्टरला रोटाव्हेटर हे जोडत असतांना रमेश कोळी अचानक त्यांचा पाय मशीनीत अडकल्याने कंबरेपासूनचा खालचा भाग गंभीर जखमी झाला.
ही घटना घडल्यानंतर गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने खासगी वाहनातून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल दुगड यांनी तपासून मयत घोषीत केले.या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. याबाबत पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.