पंचक्रोशील भाविकांनी घेतला लाभ
चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील गोलवाडे गावातील भागवत सप्ताहाचे हे २५ वे वर्ष असल्याने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. वाणीभुषण ह.भ.प. नारायण महाराज भामलवाडीकर यांच्या सुमधुर वाणीद्वारे पंचक्रोशीतील भाविकांनी कथेचे श्रवण केले.
सतत सात दिवस महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आली होती.त्यात प्रामुख्याने खान्देश रत्न पोपटराव महाराज कासारखेडा, वैष्णवविर ज्ञानेश्वर महाराज वाघ, भैरवगड, हिंदूधर्म भुषण ज्ञानेश्वर महाराज जळकेकर , हिंदुधर्म प्रचारक योगी दत्तानाथ माहाराज शिंदखेडा, महंत मनधिपती विष्णु महाराज केंद्रे अळंदी, ह.भ. प . चैतन्य महाराज देहुकर, नानासाहेब कदम महाराज बीड, ज्यांच्या मार्गदशनाखाली सदर सप्ताह संपन्न झाला असे गुरुवर्य शारंगधर महाराज मेहुण यांचे काल्याचे किर्तनाने या सप्ताहाला नवचैतन्य निर्माण झाले होते. या सप्ताहात पहाटे ५ ते ६ काकडा आरती, नंतर १२ ते ४ भागवत कथा वाचन, ५ ते ६ संध्याकाळी हरीपाठ, रात्री ८ ते १० हरी किर्तन अशी दैनंदिनी आखण्यात आली होती.
निलेश महाराज पुनखेडा, महेंद्र माहाराज रसलपुर, उमेश महाराज कळमोदा, दत्ता माहाराज भुम, गणेश महाराज शिंदे पंढरपुर, गणेश महाराज रेंभोटा, कैलास महाराज सिंगत, दत्ता महाराज चव्हाण, निलेश महाराज झांबरे भुम, संभाजी महाराज धाराशिव, उमेश महाराज कोळमदा, श्रीकांत महाराज गुरव खिर्डी, समाधान महाराज रेंभोटा, शिरिष महाराज वाघाडी, गोरख महाराज रेंभोटा, भरत महाराज मोरगाव, जगन महाराज चिंद्रखेड, मदन महाराज जळगाव जामोद, योगेश महाराज खडकोद, गोपाळ महाराज, अशोक महाराज भामलवाडी, पंकज महाराज, ज्ञानेश्वर पाटील, नितिन महाराज खिर्डी, ईश्वर महाराज, रमेश महाराज, विजय पाटील इत्यादिंचा समावेश होता. या सप्ताहाचे आयोजन समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ गोलवाडे ता रावेर यांनी केले होते. रात्री दिंडी सोहळा व ग्रंथाची मिरवणुकीने सप्ताहाची सांगता करण्यात आली .