जळगाव ( प्रतिनिधी ) ;- २६ जानेवारी रोजी झालेल्या वेट्रेन्स इंडिया स्पोर्ट्स महाराष्ट्र चॅप्पटर 2021 द्वारा आयोजित फिट इंडिया मुव्हीमेंट अंतर्गत पोलीस कराटे व स्केटिंग क्लब मध्ये एकूण १२० खेळाडूंनी व पालकांनी रनिंग स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. दिनांक २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने वेटरनस इंडिया पेट्रोटिक रन्स या खुल्या व विनामूल्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यातच्या खेळाडूंनी उस्फुर्त प्रतिसाद नोंदवून धावण्याच्या शर्यतीचा आनंद लुटला व आपण किती फिट आहोत हा संदेश दिला होता .
यात एकूण ७ पदके महाराष्ट्र संघटनेने आरजे मार्शल आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी पाठविली होती. या पदकांचे वितरण आदरणीय पोलीस निरीक्षक साहेब जळगाव पोलीस निरीक्षक रविकांत सोनावणे यांच्या हस्ते करण्यात आले.आमच्या आरजे मार्शल आर्टस् हेतू मुलांना मध्ये एक चांगली शिस्त लावणे व त्यांना मोबाईल, व्हिडिओ गेम पासून लांब करून मैदानी खेळाकडे वाळविणे व आपल्या देशाचा उत्तम खेळाडू बनविणे हा ही हेतू आहे.कराटेचे प्रशिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी हिंसा न शिकता सेल्फ डिफेन्स शिकावे हा आहे .

मुलांनी शिस्तबद्ध रित्या कराटेचे प्रशिक्षण घ्यावे व भविष्यात राष्ट्रीय पातळीवर आपले नावलौकिक करावे अशी अपेक्षा पोलिस निरीक्षक रविकांत सोनावणे यांनी व्यक्त केली.
कराटे प्रशिक्षक राजेंद्र जंजाळे यांनी आपले मनोगतातून विद्यार्थ्यांना चांगली मेहनत घ्यावी व भविष्यात राष्ट्रीयव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचावे व आपल्या सोबत आपल्या राज्याचे व देशाचे नावलौकिक करावे असे सांगितले.
सौ. हेमलता बडगुजर विद्यार्थी पालक यांनी आपल्या कराटे क्लब सुरू होण्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो.कोविड-19 मुलं खूप कंटाळली होती व त्यांना आता खूप आनंद होतोय की पुन्हा खेळायला कराटे सुरू केले. क्लब उत्तम कार्य करत असल्याचे पालक आपल्या मनोगतातून व्यक्त करीत होते.
कराटेच्या खेळाडूंनी उत्तम प्रात्यक्षिके सादर करून सर्वांची लक्ष वेधून घेतली.कार्यक्रमच्या प्रसंगी पोलीस निरीक्षक रविकांत सोनावणे ,एल,आय,बी राजेश पाटील,कराटे प्रशिक्षक जळगाव राजेंद्र जंजाळे व ए,एन,ओ, डॉ.योगेश बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते.या वेळी कराटे चे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले
विजय स्पर्धक खालील प्रमाणे:-
दुसरा ग्रुप मुली
प्रथम :- पूर्वा पाटील
तिसरा 2 ग्रुप मुले
प्रथम :- कुणाल शिरसाठ
तृतीय :- प्रथमेश पाटील
चौथा ग्रुप मुली
तृतीय :- मानसी बडगुजर
चौथा ग्रुप मुले
प्रथम :- चारुदत्त शिरसाठ
पाचवा ग्रुप मुले
प्रथम :- कार्तिक शिरसाठ
पाचवा ग्रुप मुले
द्वितीय :- मयूर शिरसाठ
तृतीय :- अनिकेत तायडे
व सहभागी स्पर्धक खालील प्रमाणे:-
१) शिवांश पाटील
२) आरव पाटील
३) रूपेश शिरसाठ
४) क्रुष्णा बडगुजर
५) रोशनी पाटील
६) निशांत पाटील
७) प्रणव राजपुत
८) पलक राजपुत
कार्यक्रमाचे आयोजन आरजे मार्शल आर्टस् अकॅडमी चे प्रशिक्षक यांनी केले.सूत्र संचालन माळी व प्रास्ताविक आभार प्रदर्शन मयुर भरत शिरसाठ यांनी केले .
कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी सहाय्यक प्रशिक्षक राहुल माळी,अनिकेत तायडे ,यांचे सहकार्य लाभले”. खेळाडूंना पुढील वाटचाली साठी पोलीस निरीक्षक रविकांत सोनावणे ,राजेंद्र जंजाळे, एल,आय,बी राजेश पाटील व ए,एन,ओ डॉ.योगेश बोरसे यांनीशुभेछा दिल्या.






